हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले,अनिल देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.