हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत असून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा घाट शिवसेनेकडून घातला जात आहे. दरम्यान कॉँग्रेसने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर संजय राऊत यांनी सामनातील रोखठोख सदरातून कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारले असता संजय राऊत यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय अस राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या काही टोले लगावले. औरंगजेबच्या प्रेमात कोणी पडू नये, औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा विषय अस राऊत म्हणाले. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
औरंगजेब क्रुर शासक होता. त्याला परधर्माविषयी प्रेम नव्हंत. तो धर्मांध होता. अशा राजाच्या नावाविषयी कुणीही आग्रही राहू नये अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले. “ज्यांना औरंगजेब आणि संभाजीराजे काय आहे हे माहीत करुन घ्यायचे असेल तर आधी औरंगजेब समजून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही सांगितले आहे, की औरंगाबाद शहर आमच्यासाठी संभाजीनगर आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. मात्र, आजवर देशात त्यांच्याइतका सेक्युलर राजा झाला नाही. बाबर, निजाम, औरंगजेब ही काही आपली प्रतिकं असू शकत नाहीत. हा देशाच्या आणि राज्याच्या अस्मितेचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’