हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.
मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात व राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यूप्रकरणी पास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.
या प्रकरणात काहीतरी गडबड नक्कीच आहे. जी स्कॉर्पिओ गाडी सापडली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या मुंब्य्राच्या खाडीत सापडला आहे. मनसुख यांचा मृत्यू संशयास्पद, तितकाच रहस्यमय आहे’ असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शुक्रवारी मनसुखप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. पूजा चव्हाण, मनसुख हिरेन, स्फोटकांनी भरलेली गाडी हे सर्व कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातील विषय आहेत. विरोधी पक्षाने या सगळ्यांवर जोरकसपणे आपले मुद्दे मांडले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी गृह खाते सांभाळले आहे. त्याचा फायदा त्यांना होतोच. पोलीस खात्याच्या संदर्भातील आतली माहितीही त्यांना मिळते. मनसुख प्रकरणातील काही वेगळी माहिती त्यांनी मांडली, पण फडणवीसांनी जाहीर केलेली माहिती म्हणजे अधिकृत तपास यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष नाही, पण मनसुख प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होईल व सरकारला उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही’ असंही शिवसेनेने म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’