हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरीचा ढाचा पाडला त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता मात्र मी त्यावेळी तिथे उपस्थित होतो असा दावा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांच्या या विधानाचा जोरदार संचार घेतला आहे. फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल चिमटा शिवसेनेने लगावला. पाकिस्तानात अमेरिकेचे कमांडो घुसले व त्यांनी ‘अल कायदा’चा ‘डॉन’ लादेन याला मारले तेव्हाही आम्ही तेथेच होतो, असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत असा टोलाही शिवसेनेनं लगावला.
श्री. फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होती!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल ते शिवसेनेनं म्हंटल
राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी भाजपच्या वतीने स्पष्ट केले की, “बाबरी पाडण्यात भाजपचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे.” भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते. फडणवीस हे त्या उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासाला नसावी? हे आश्चर्यच आहे. मुख्य म्हणजे तेव्हाचे अयोध्या लढयाचे सेनापती श्री. लालकृष्ण आडवाणी यांनीही ‘बाबरी आम्ही पाडली नाही. बाबरी पडल्याचे कळताच मला धक्का बसला. तो आमच्यासाठी काळा दिवस होता,’ असे स्पष्ट केले होते.
त्या काळ्या दिवसासाठी भाजप आता श्रेय का घेत आहे? बाबरीचा ढांचा पाडला हे एक राष्ट्रीय कार्यच होते व त्याच्या श्रेयवादाची स्पर्धा इतक्या वर्षांनी करण्यात काय मतलब? पाकिस्तानात अमेरिकेचे कमांडो घुसले व त्यांनी ‘अल कायदा’चा ‘डॉन’ लादेन याला मारले तेव्हाही आम्ही तेथेच होतो, असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत. अशी टीका शिवसेनेनं फडणवीसांवर केली