हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णय म्हणजे लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदींवर सडकून टीका केली आहे.
ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?, हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे. पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली? किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचे नामकरण केले. तिथेही तोच निकष लावता येईल, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसच्या सरकारने, नेहरू, गांधी, राव, मनमोहन, मोरारजी, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांनी जे काही केले ते सर्व धुवून आणि पुसून टाकायचे, असे कुणाचे राष्ट्रीय धोरण किंवा राज्य चालवायची भूमिका असेल, तर कपाळ पहडून उपयोग नाही. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल.असा टोला शिवसेनेने केंद्राला लगावला.
महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांचे कतृत्वही मोठेच आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे ते महान कुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न व्हावा, असा सूज्ञ विचार कोणाच्या मनात का येऊ नये? ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर, तसे खाशाबा हे कुस्तीचे जादूगार होतेच,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. असं शिवसेनेनं म्हटलं