हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाडोत्री लोकांची गर्दी जमवून विचारांची घोडदौड करता येत नाही. शिवसेनेला शह वगैरे देण्यासाठी दुसरा दसरा मेळावा म्हणे बीकेसीच्या मैदानात झाला त्या मैदानावरील गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले, “पहा हीच आमची खरी शिवसेना” पण शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणारयांच्या पाठिंब्यावर तुमचा तो मेळावा झाला असं म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून शिंदे गटावर निशाणा साधला.
शिवसेनेचा ऐतिहासिक, पारंपरिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणे त्याच उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या वेळचा जोश, गर्दी, उत्साह नेहमीपेक्षा जरा जास्तच होता. शिवतीर्थ भरून ओसंडून वाहत होते. त्यामुळे डॉक्टरांची वाकण्याची परवानगी नसतानाही आम्ही निष्ठावान शिवसैनिकांपुढे वाकून नतमस्तक झालो. शिवसैनिकांच्या निष्ठा आणि जनतेचे है असे प्रेम हेच आमचे बळ त्या बळावरच पाठीत खुपसलेले खंजीर पचवून आम्ही उभे आहोत. शिवतीर्यावरील गर्दी भाडोत्री आणि पोटाची नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे असं शिवसेनेने म्हंटल.
‘डुप्लिकेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यांचे भाषण म्हणजे फक्त ‘मोदी-शहा चालिसा’चे वाचनच होते. पठणही नव्हते, फक्त वाचन, भारतीय जनता पक्षानेच या बीकेसीवरील इव्हेन्टची कथा-पटकथा लिहिली असल्याने मुख्य भाषणाचा मसुदा, रंगमंचावरील पात्रे, त्यांच्या भूमिका, संवाद हे तिकडूनच लिहून आले होते. ‘माझ्यावर कसा अन्याय झाला आणि मीच कसा खरा’ यापलीकडे बीकेसीवरील रडकथेत दुसरे काही सापडत नाही. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याविषयी आम्हाला आदर, प्रेम, आस्था आहेच. पण ज्या ‘डुप्लिकेट’ सेनेचा मेळावा की उत्सव बुधवारी झाला, त्याचे वेगळे अस्तित्वच नव्हते. मिथे गट जणू भाजपमध्ये विलीन होऊनच तुतारया आणि पिपाण्या वाजवीत आहे असेच सगळे चित्र होते. ‘मोदी मोदी आणि शहा शहा अशा जेवढया गर्जना भाजप मेळाव्यात होत नसतील तेवढया ‘डुप्लिकेट’ सेनेच्या मुख्य नेत्यांच्या भाषणात होत होत्या. हे आक्रितच म्हणावे लागेल.
दोनेक हजार एसटी गाडया गदी मुंबईत आणण्यासाठी बुक झाल्या व त्याकामी 10 कोटी रुपये रोख भरण्यात आले. हे रोख 10 कोटी रुपये एसटी कर्मचारी तीनेक दिवस मोजत होते. आता हे रोखीतले 10 कोटी मिंधे गटाच्या कोणत्या बँक खात्यातून आले? इतक्या कमी वेळात कोणी कोठे हात मारला? शिवाय दोन लाख लोकांना पंगत दिली गेली. बीकेसी मैदानामागे शाही जेवणाची पंगत असावी तसा सगळा लग्नाट होता. येथे विचार ॥ वारशाचा मेळावा (?) होता की ‘हाऊ टू मिंधे’, ‘नमस्ते मिथे’सारखा उत्सव होता, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे असा चिमटा शिवसेनेने काढला.