एका आमदारकीसाठी तांबेनी प्रतिष्ठा गमावली; सामनातून निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा नाशिक मध्ये आपला उमेदवार उभा केला नाही, या सर्व घडामोडींमागे भाजपचाच हात आहे का? अशा चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि सत्यजित तांबे यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात एका कार्यक्रमादरम्यान संकेत देऊनही काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाहीआणि एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली असं शिवसेनेने म्हंटल.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सगळेच उलटे पालटे घडले. कांग्रेस उमेदवार विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक मारलेली पलटी धक्कादायक आहे. डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली. पण डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचा ‘एबी’ फॉर्म असूनही पक्षातर्फे अर्ज भरला नाही. मात्र त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. मुलास आमदार करावे याच उदात्त हेतूने डॉ. तांबे यांनी ही खेळी केली व त्यामागे भारतीय जनता पक्षाचे पेच आहेत. भाजप आता सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याची भाषा करू लागला आहे. हे औदार्य काय अचानक उफाळून आलेले नाही असं शिवनेनेने म्हंटल.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही. नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये हे घडले असे सांगितले जाते. हाती सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की, असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. यात राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे. तरीही महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल.

शिक पदवीधर मतदारसंघात ‘तांबे’ मंडळीची तयारी आधीपासूनच सुरू होती व गेल्या महिन्यात एका जाहीर कार्यक्रमात श्री. फडणवीस यांनी तसे संकेतही दिले होते, पण काँग्रेस नेतृत्वास जाग आली नाही व एका आमदारकीसाठी तांबे यांनी प्रतिष्ठा घालवली. या सगळ्यात गोंधळ उडाला तो महाविकास आघाडीचा. वास्तविक महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती, पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. तरीही मैदान सोडता येणार नाही असं सामनातून म्हंटल आहे.