हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्ह याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. आज दुपारी १२ नंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे, याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावरच आज सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याअध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही याचिकांचे क्रमांक अनुक्रमे 18 तसंच 19 असे आहेत.
ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंधर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे त्यावरही आजच सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुद्धा ठाकरे गट कोर्टात गेला आहे . आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरही आजच सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस आहे अतिशय महत्वाचा आहे.
यापूर्वीच्या सुनावणीवेळी सर्वोच्य न्यायालयाने आमदार अपात्रतेबाबतचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याना दिले होते. तसेच त्यावेळी कोर्टाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे सुद्धा नोंदवली होती. येव्हडच नव्हे तर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे याना दिले याबाबत निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था असलयाने त्यावर आम्ही काय करू शकत नाही असं कोर्टाने त्यावेळी म्हंटल होत. मात्र आजच्या सुनावणीत नेमकं काय घडत? शिवसेनेची कमान एकनाथ शिंदेंकडेच राहणार का ? की पुन्हा ठाकरेंकडे येणार हे पाहणे महत्वाचे आहे.