मुंबई प्रतिनिधी | आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना व्यापक जनसंपर्काचे माध्यम हाती घेत असून येत्या काही दिवसात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे काम केले जाईल असे सामन्यातून प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तावरून दिसून येते. शिवसेना वर्धापन दिना दिवशी या संदर्भात शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुळकर यांनी विस्तारित माहिती दिली होती.
प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असावी आणि तो शिवसैनिक संघटनेत हिरहिरीने सहभागी होऊन काम करेल असे या नव्या संघटन बांधणीचे सूत्र आहे. तसेच या नव्या शाखा प्रमुखांना पक्षाकडून डिजिटल ओळखपत्र देखील दिली जाणारा आहेत. तसेच शिवसेना विभाग प्रमुखांनी या शाखा प्रमुखांची निवड करताना कोणत्याही पध्द्तीचा पक्षपात करू नये. तसेच आपल्याच नातेवाईकाची वर्णी या पदी लावू नये असे नेरुळकरांनी सांगितले आहे.
शाखा प्रमुख होण्यासाठी हि असणार पात्रता
तो शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता असला पाहिजे.
त्याने गावात शिवसेना वाढवण्यासाठी या आधी काम केलेले असले पाहिजे.
१४ ते २७ जुलै या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे
ज्यांना शाखा प्रमुख व्हायचे आहे. त्यांनी १ ते ७ जुलै या कालावधीत शिवसेना भवनमध्ये आपले अर्ज जमा करायचे आहेत.