विधानसभेची निवडणुक घ्या मग बघू; उद्धव ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा अस खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती तुम्ही घातपाताने का केलात असा सवाल करत तुमच्यात जर हिंमत असेल तर विधानसभेची निवडणूक घ्या, आम्ही चुकलो असेल तर जनतेचा निर्णय मान्य करून आम्ही घरी बसू आणि जर ते चुकले असतील तर जनता त्यांचंबाबत जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि शिंदे गटाला आव्हान दिले.

शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह सोडावं लागणार? उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद LIVE

जे शिवसेनेत गप्प होते ते आता शिंदे गटात जाऊन बोलके झाले आहेत. असा टोला त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. माझ्या कुटुंबावर टीका झाली तेव्हा यातील कोणीच बोललं नाही. ज्यांनी आत्तापर्यंत मातोश्रीवर विकृत टीका केली. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्याचे ज्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता? ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला

Leave a Comment