नारायण राणे स्वार्थी राजकारणी, संभाजी राजेंसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही; राऊतांचा राणेंवर प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजे यांच्यावर जहरी टिका केली होती. संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही.  ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. त्याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत राणेंवर जोरदार प्रहार केला. नारायण राणे स्वार्थी राजकारणी असून संभाजी राजेंसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही असं विनायक राऊत यांनी म्हंटल.

खासदार संभाजी छत्रपती आणि नारायण राणेंची तुलना होवू शकत नाही. संभाजीराजेंनी मला दे, मला दे असं भांडून खासदारकी मिळवली नाही. त्यांना दिलेली खासदरकी हा बहुमान आहे. मात्र राणेंची सोशल मीडियावरून केवळ प्रसिद्धीसाठी टिवटिव सुरू आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तसेच संभाजी राजेंची संयमाची भूमिका योग्यच आणि कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते –

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. मात्र ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही. अशा शब्दांत राणेंनी संभाजी राजेंवर टीका केली होती. तसेच खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं, असं नारायण राणे म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment