हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश निवडणूक येत्या काही महिन्यांवर आल्या असून राजकीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उत्तरप्रदेश मध्ये बलाढ्य भाजपला मात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ,समाजवादी पक्ष आणि राजद यांनी आघाडी केली आहे. परंतु शिवसेना मात्र या आघाडीत सामील होणार नसून स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय. सपा, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी त्यांच्या आघाडीला शिवसेनेने पाठिंबा का द्यावा?’, असा सवाल संजय राऊत यांनी केला. शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल अस म्हणत त्यांनी राष्ट्रवादी, सपा आणि राजदच्या आघाडीला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, यावेळी त्यांनी पैगसिस प्रकरणावरून केंद्र सरकार वर सडकून टीका केली. या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही. केंद्र सरकारला लोकशाही संसदीय प्रणालीवर विश्वास नाही. पैगसिसच्या चर्चवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यानीनी संसदेत उपस्थित राहाव मोदी- शाह या चर्चेला ३ तास का देख शकत नाही,’ असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.