मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्याची जनता भाजप सोबत शिवसेनेच्या देखील पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला मोठा वाटा दिला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपुष्ठात आल्या बरोबर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप यासाठी अनुकूल असुन शिवसेना देखील तयार असल्याचे समजते.
बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव !
विधानसभा निवडणुकीला भाजपला शिवसेनेची आवश्यकता पडणार असल्याने भाजप शिवसेनेला होता होईल एवढा गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिवसेनेला केंद्रात देखील महत्वाची पदेदिली जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांप्रमाणे आकस्मित सत्ता हातून जावू नये म्हणून भाजप विधानसभेची निवडणूक अत्यंत सावध पद्धतीने लढणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. त्यामुळेच भाजपने आपला जुना जोडीदार असणाऱ्या शिवसेनेला सोबतच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा फोन
उपमुख्यमंत्री पदासाठी या ३ सेना नेत्यांच्या नावांची चर्चा
रामदास कदम
कोकणातील खेड येथील मुळचे असणारे रामदास कदम हे शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणून गणले जातात. ते सध्या राज्याचे पर्यावरण मंत्रीपद सांभाळत आहेत. तसेच रामदास कदम यांना विधान सभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करण्याचा देखील अनुभव आहे. त्यामुळे त्यांची या पदी वर्णी लागू शकते.
#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?
एकनाथ शिंदे
शिवसेनेचे महत्वाचे नेते असणारे एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्हात मोठे वलय आहे. त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. सध्या त्यांचा समावेश राज्य मंत्रीमंडळात देखील आहे. तसेच त्यांचे पुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य आहेत. म्हणून एकनाथ शिंदे यांचे देखील पारडे उपमुख्यमंत्री पदासाठी जड असल्याचे मानले जाते आहे.
निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी
सुभाष देसाई
सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच हुशार आणि कार्यक्षम नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळ जवळीक निर्माण करण्यात देखील सुभाष देसाई यांनी यश मिळवले असल्याने त्यांच्या देखील नावाची चर्चा या पदासाठी आहे.
लोकसभा निकालाच्या सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?
धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून
कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून
Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र
निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?