One MobiKwik आणि Spice Money ला RBI ने ठोठावला दंड, यामागील कारण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील दोन पेमेंट सिस्टम ऑपरेटर One Mobikwik Systems आणि Spice Money Limited यांना मोठा झटका बसला आहे. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोघांना दंड ठोठावला आहे. One Mobikwik Systems आणि Spice Money या दोन्हींवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती RBI ने दिली आहे.

सेंट्रल बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,’One MobiKwik आणि Spice Money ने भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिटसाठी नेट वर्थ आवश्यकतांबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली नाही.’

यासाठी दोन्ही ऑपरेटर्सना नोटीस बजावण्यात आल्याचे RBI ने सांगितले, त्यानंतर दोघांनीही आपले उत्तर दाखल केले. मात्र, त्यांच्या जबाबानंतर नियम न पाळल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाली. RBI च्या म्हणण्यानुसार, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम ऍक्ट 2007 च्या कलम 26 (6) च्या आधारे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही पेमेंट सिस्टम ऑपरेटरवर दंड ठोठावला आहे.

अलीकडेच RBI ने PNB आणि ICICI बँकेवर दंड ठोठावला आहे
अलीकडेच RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक आणि खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेला दंड ठोठावला होता. केंद्रीय बँकेने पंजाब नॅशनल बँकेला 1.80 कोटी रुपये आणि ICICI बँक लिमिटेडला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Leave a Comment