फडणवीसांची विधानसभेत तुफान बॅटिंग; ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफान बॅटिंग करत महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राज्यात कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा घेणारे पेपर विकतायत, राज्यात दंगली होतायत, तलवारी निघतायत, सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेचा बोजबारा उडालाय, रुग्णालायामध्ये आगी लागतायत. असे म्हणत फडणवीसांनी राज्यातील एकूण परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला

राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या तेजस्वी महापुरुषाचे सुपुत्र आहेत पण आजची राज्याची अवस्था पाहून त्यांनाही वेदना झाल्या असतील असे फडणवीसांनी म्हंटल. आज आम्हाला मदिरा विक्री जास्त महत्त्वाची वाटते. देशातील २७ राज्यांनी पेट्रोलचा दर कमी केला मात्र या सरकारने मद्यावरचा कर कमी केला अशी टीका फडणवीसांनी केली

विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणत हे सरकार सत्तेवर आले मात्र यांचाच काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या. परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी जीव देत आहेत, एसटी कर्मचारी जीव देत आहेत असा आरोप फडणवीसांनी केला

शक्ती कायद्यावर विधानसभेत चर्चा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून देखील फडणवीसांनी सरकारला धारेवर धरले. ६ हजार कर्मचारी निवृत्त झाले त्याना मद्त मिळाली नाही, ४०० कर्मचाऱ्यांनी जीव सोडला त्यांनाही मदत मिळाली नाही. हि परिस्थिती सहानभुतीने हाताळली असती तर आज हि वेळ आली नसती असे फडणवीसांनी म्हंटल. मंत्रीमहोदय जर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर २ पाऊले पुढे आले असते तर कर्मचारीही २ पाऊले पुढे आले असते आणि हा प्रश्न सुटला असता असे फडणवीसांनी म्हंटल

Leave a Comment