सांगली । मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 31 विद्यार्थिनी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व विद्यार्थिनींच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात आले असले तरी ओमीक्रॉनचे रूग्ण वाढत असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालय प्रशासनाचे सर्वच विभाग आता सतर्क झाला आहे.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनीची सोमवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सिद्यार्थिनींची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वजण पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे ही संख्या 31 वर गेली आहे. या विद्यार्थिनींमध्ये लक्षणे अतिशय सौम्य आहेत. विद्यार्थिनी कोणाच्या संपर्कात व कुठे गेल्या होत्या याचा कॉन्टॅक्ट ट्रेेसींग सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी कोरोना बाधित आढळल्याने पूर्ण हॉस्टेल प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थिनींमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे काळजीचे काहीच कारण नाही. प्रशासन सतर्क असल्याचे मिरज वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.