धक्कादायक ! परभणीत दोन दिवसाचे स्त्री अर्भक झाडाझुडपात फेकले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे गावच्या बाहेर असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये सोमवारी सायंकाळी दोन दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेगाव येथील गाव शेजारी असणाऱ्या पांदण रस्त्याच्या परिसरात सोमवार १८ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा चेंडू हरवला असता ,तो शोधताना त्यांना झाडाझुडुपांमध्ये एक अर्भक असल्याचे दिसले. लहान मुलांनी घाबरलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान गावकऱ्यांनी याठिकाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. यातील काही ग्रामस्थांनी पाथरी पोलिसांना घटनेचे माहिती दिली. पोलीस कर्मचारी रात्री ७ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते .यावेळी झाडातील मृत अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असता १ ते २ दिवसाच्या मृत अर्भकाच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या .

देवेगाव येथील सुदर्शन विठ्ठल गलबे यांनी माहिती दिल्यावरून पाथरी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक टोपजी कोरके अधीक तपास करत आहेत. दरम्यान अत्यंत निर्दयीपणे स्त्री अर्भकाला झाडाझुडपात फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा अशी ग्रामस्थांमधून आता मागणी होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment