औरंगाबाद – पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले व धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. कैलास बीआनसिंग मिंगवाल (27, मूळ रा. जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश, ह.मु. करोडी शिवार दौलताबाद) असे हत्या झालेल्या मजुरांचे नाव आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कैलास हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वी तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेतील करोडी शिवारात आला होता. तेथे तो गट क्रमांक-111 मध्ये शेतात कामाला होता. शेताजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नीसह वात्सवयास होता. नित्यप्रमाणे कैलासने रात्री पत्नीसह जेवण केले.व दोघेही झोपी गेले. दरम्यान मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने झोपलेल्या अवस्थेतच कैलास ला फरपटत बाहेर नेले व धारदार हत्याऱ्याने कैलासच्या गळ्यावर तीन ते चार वार करून पसार झाला. पतीवर हल्ला झाल्याने कैलासच्या पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी कैलासच्या घराकडे धाव घेतली मात्र, तोपर्यंत मारेकरी अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमी कैलासला रुग्णालयात हलविले, मात्र तो प्रयन्त कैलासची प्राणज्योत मावळली होती. कैलासच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार आरोपी अनोळखी होता. त्याने कैलासला का मारले हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट; मारेकरी एकच –
कैलास हा मध्यप्रदेश येथील मजूर होता.रात्री एका अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली आहे. मारेकरी कोण आहे.मारण्याचा उद्देश काय? जुने काही वैर होते का? याचा तपास सुरू आहे. पोलीस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. – सुनीता मिसाळ, पो.निरीक्षक, दौलताबाद ठाणे.