हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे कहर रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित केले गेले आहे,तरीपण काही देशातील अनेक नागरिक या लॉकडाउनचे पालन करीत नाही आणि सरकारच्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. दरम्यानच एका देशाने नागरिकांना एक नवीन चेतावणी दिली आहे कि जे लॉकडाऊनचे पालन करणार नाही त्यांना गोळ्या घाला.
खार तर लॉकडाऊनवर फिलिपिन्सचे राष्ट्र्पती रोड्रिगो दुतेर्तेने एक मोठी घोषणा केली आहे.त्यांनी धमकीवजा समज देताना म्हणाले, “लॉकडाउनच्या नियमाचे जे कोणी उल्लंघन करतील,त्यांना गोळ्या घाला . अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्तेने सरकार, पोलिस आणि प्रशासनाला सांगितले की कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी करावा लागलेल्या लॉकडाउनचे सर्वानी पालन करावे,जे कोणी यात अडचण निर्माण कातिल त्यांना त्वरित गोळ्या घालण्यात याव्या. तो म्हणाला की ही देशाला चेतावणी आहे.लोकांनी सरकारच्या आदेशाचे गांभीर्याने पालन करा.
त्याशिवाय त्यांनी हे हि सांगितले कि या संकटसमयी कोणीही आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर याना त्रास द्यायचा नाही.अन्यथा हा एक गंभीर अपराध मानला जाईल. याशिवाय या लॉक डाउन मध्येकोनी समस्या निर्माण करत असेल तर गोळी घाला अशा सूचना त्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांना
दिल्या.
यापूर्वीही राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते ने गोली मारण्याचा आदेश दिला होता. असा आदेश त्यांनी वर्ष २०१६-१७ मध्ये ड्रग डिलर्ससाठी दिला होता. त्यांनी पोलिसांना आदेश दिले होते की ड्रॅग डिलर्सना विनाकायदेशीर कार्यवाही करून मारून टाका. फिलीपिन्स मध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या २३११ पेक्षा जास्त प्रकरणे सापडली आहेत, त्यापैकी ९६ लोक मरण पावले आहेत. याआधीच देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. फिलीपिन्सचे संसद आणि केंद्रीय बँक देखील क्वारन्टीन केले गेले. आपल्या राष्ट्रपतींनी आपली कोरोनाची तपासणी केली आहे,जी निगेटिव्ह आली त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’