औरंगाबाद । एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पडेगाव येथील हॉटेल मनीष इन या हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, हाॅटेल मालकाला धमकवण्याच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलीस यंत्रणा चांगलीच हादरली असून घटनेचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. तरी पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पडेगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी शोधकार्य हाती घेतले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा