शिंदेंकडून मला मारण्याची सुपारी; संजय राऊतांचे फडणवीसांसह पोलीस आयुक्तांना पत्र

0
143
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सर्वोच्च न्यायालयात आजपासून सत्तासंघर्षाच्या सुनावणी सुरु असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदेंकडून मला मारण्याची सुपारी दिली असल्याचे पत्रात राऊतांनी म्हंटले आहे. राऊतांनी हे पत्र ट्विट केले आहे.

राऊतांनी पत्रात म्हंटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली आहे. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे,अशा आशयाचे पत्र संजय राऊत यांनी दिले आहे.