मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून श्रीकांत शिंदेंचा कारभार? राष्ट्रवादीने शेअर केला फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे हे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवरून आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला असून त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय .हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असं म्हणत त्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

सदर फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे ज्या खुर्चीत बसलेले दिसून येत आहेत त्यांच्या पाठिमागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा फलक दिसून येत आहे. दरम्यान, या फोटोनंतर सत्ताधारी शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आता या फोटोवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.