व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार? अजित पवारांचा कार्यकर्त्यांना नेमका सल्ला काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढायचं असं समजूनच कामाला लागा अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. अजित पवार हे साताऱ्यातील सोळशी या ठिकाणी एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या च्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी याबाबत सूचना केल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कोणासोबत आघाडी करायची हे आम्हाला विचारत बसू नका. तुम्हाला स्वतंत्र लढायचं असं समजूनच कामाला लागा. जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला बरोबर घ्यायचे असतील तर राज्यपातळीवर तो निर्णय होईलच. पण इथल्या निवडणुका आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच लढवतो. जिथे आपल्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे आपण स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवली आहे असं म्हणत आता पायाला फिंगरी बांधून फार असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.

यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. हे कसले सर्वसामान्‍यांचे सरकार, फोडाफोडीचे राजकारण करून बाहेर पडणाऱ्यांचे हे सरकार आहे. चुकीच्या पद्धतीने आर्थिक आमिष, सत्तेची प्रलोभन दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले तर यामधून स्थिरता राहणार नाही असेही त्यांनी म्हंटल.