धुळे । पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधून गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कावठे या गावात श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील परमपूज्य, गुरुवर्य त्यागीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत हा भागवत कथा सेवा सप्ताह दि. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.गुरुवर्य त्यागीजी महाराज यांचे कावठे गावात आगमन झाले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
कथेचे हे दुसरे वर्ष आहे.गेल्या वर्षी देखील अतिशय आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला होता.त्यामुळे यंदा सुद्धा मोठ्या आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडेल अशी आशा गावातील तरुण मित्र मंडळाने व्यक्त केली.
कथेचे मुख्य आयोजक दिलीप बोरसे यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितले की “देशावर सतत येणारी संकट आणि पर्यायाने अखिल मानव जातीवर येणाऱ्या संकटांचा नायनाट व्हावा आणि विश्व शांती लाभावी गावाचा,समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही या कथेचे आयोजन केले आहे.आजची तरुण पिढी अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागली तरच त्यांचे कल्याण आहे.आपल्या गौरवशाली अध्यात्मिक परंपरेचा तरुणांना लाभ मिळावा म्हणून देखील आम्ही या कथेचा नियोजनाचा घाट घातला आहे.असेही बोरसे पुढे म्हणाले.
गावात आणि परिसरात कथेमुळे एकंदरीत आनंदाचे आणि शांततेचे वातावरण आहे आणि एक वेगळाच अध्यात्मिक आनंद मिळतो आहे अशी भावना बऱ्याच गावकऱ्यांनी हॅलो महाराष्ट्रकडे बोलताना व्यक्त केली.
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील FD चे व्याजदर वाढवले, नवे दर तपासा
Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!
Vivo V25 Pro : 64MP कॅमेरावाला Vivo चा दमदार मोबाईल लाँच; पहा फीचर्स आणि किंमत