हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर कोणी लाखोंची नोकरी सोडून गाढव पाळले तर नक्कीच तुम्ही त्याला वेड्यात काढाल, पण कर्नाटक येथील एका व्यक्तीने गाढव फार्म सुरू करून इतिहास रचला आहे. श्रीनिवास गौडा अस या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आयटी मधील लाखोंची नोकरी सोडण्याचे धाडस केले.
श्रीनिवास गौडा यांनी 2020 मध्ये नोकरी सोडून दुसऱ्या करिअर कडे लक्ष घातले. त्यांनी इरा गावात 2.3 एकर जागेवर प्रथम एकात्मिक कृषी आणि पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकास केंद्र सुरू केले. कडकनाथ, शेळीपालन यानंतर त्यांनी गाढवाचे फार्म सुरू केले.
गाढवाचे दूध पॅकेटमध्ये पॅक करून विकण्याचा विचार श्रीनिवास करत आहेत. याबाबत त्यांनी सांगितले की गाढवाचे दूध चवदार, औषधी मूल्याचे आणि खूप महाग असते. 30 मिली दुधाच्या पॅकेटची किंमत 150 रुपये आहे आणि ते मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमधून पुरवले जाईल. यासोबतच ब्युटी प्रोडक्ट्सच्या वापरासाठी गाढवाचे दूध विकण्याचीही त्यांची योजना आहे. विशेष म्हणजे त्यांना या दुधाच्या 17 लाख रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत