श्रीवर्धन प्रतिनिधी | कोकण किनारपट्टीलगत श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा केंड प्रजातीचा मासा आढळला आहे. सदर माशाला इंग्रजी भाषेत पफरफिश असे म्हणतात. किनारपट्टीवरील पर्यटकांनी तातडीने या माशाला समुद्रात सोडून जीवदान दिले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार श्रीवर्धन येथील किनारपट्टीवर पर्यटकांचा नेहमीच वावर असतो. बर्याचदा समुद्रातील दुर्मिळ जलचर समुद्राच्या लाटेबरोबर किनारपट्टीवर वाहुन येतात. मात्र त्यातील काही विषारी असल्याने बाहेरुन आलेले पर्यटक सहसा अशा वस्तुंना हात लावत नाहीत. परंतु बुधवारी सायंकाळी किनारपट्टीवर फिरायला गेलेल्या पर्यटकांना एक दुर्मिळ मासा तडफडताना दिसला. तेव्हा स्थानिकांनी आणि पर्यटकांनीवत्या माशाला पाण्यात सोडून जीवदा दिले.
सदर मासा वादळापूर्वी किनारपट्टीवर येतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे. तसेच हा मासा खोल समुद्रात समुहाने राहतो असे मच्छिमार सांगतात. या मासाचे दात इतके मजबुत असतात की तो सहजपणे मासेमारीचे जाळे तोडून पलायब करतो.
इतर महत्वाच्या बातम्या –
वाळू चोरी करणार्या गाढवांना पोलीसांनी ठेवले डांबून
झोपडीत राहणारा हा नेता झालाय केंद्रात मंत्री!
त्रास देणाऱ्या मुलाचा चिडलेल्या उंटाने घेतला जीव !
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात