दिलासादायक ! कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणावर घट

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत होत. परंतु आज मात्र कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आज 596 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 463 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 133 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 61 हजार 997 झाली आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3678 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7957 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 364 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 251 तर ग्रामीणमधील 113 रुग्णांना सुटी देण्यात आली.