औरंगाबाद | आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत जिल्ह्यात अंशतःलॉक डाऊन लावून देखील नागरिक कारणे दाखवून रस्त्यावर फिरत आहेत. नागरिकांनी मदत करावी आता पर्यन्त प्रशासनाने लॉकडाऊन टाळले मात्र वेळ आलीच तर उद्योगा बाबत विचार केला जाईल.असे म्हणत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊनचे संकेत तर दिले नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
आज सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला या वेळी त्यांनी जिल्ह्यातील खाटाच्या उपलब्धतेबाबत जिल्ह्यात सीसीसी मध्ये चार हजार बेड असून सुमारे पंधराशे बेड खाली असल्याचे सांगितले. तर या पुढे रुग्णाची लक्षणे पाहूनच रुग्णांना रुग्णावर कुठे उपचार करायचा हे ठरविले जाणार आहे. सूक्ष्म अति सूक्ष्म लक्षणे असणाऱ्या रुग्णावर कोविड केअर सेंटर येथे उपचार केले जाणार असून गंभीर रुग्णाना रुग्णालयात दाखल करून घेतले जाणार असल्याचे देखील स्पष्ट केले. ज्यांच्या कडे सुविधा आहे अशांसाठी होम आयसोलेशन पर्याय देखील राहणार आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून आता पर्यंत पूर्णतः लॉकडाऊन टाळण्यात आले होते.त्यामुळेच अंशतः लॉक डाऊन करण्यात आले होते.मात्र बहुतांश नागरिक हे नियम न पळता रात्री फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नागरिकांत जनजागृती होणे गरजेचे आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.तर नागरिकांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पूर्णतः लॉकडाऊनची वेळ आली तर जनसंन्याचा विचार केला जाईल.तसेच औधोगिकनगरी व त्यावर अवलंबून असलेल्याचा विचार करू असे चव्हाण म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांचे हे वाक्य लॉक डाऊन चे संकेत तर नाही ना अशी चर्चा आता औरंगाबादेत सुरू झाली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group