मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘मौन सत्याग्रह’

औरंगाबाद – मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्या साठी गांधी जयंती चे औचित्य साधुन ‘मौन सत्याग्रह’ 2 आक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत राज्यभर अत्यन्त शांततेत पार पडला.

या मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून केंद्राचे घटनात्मक आरक्षण, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, महागाईवर नियंत्रण आणणे, युवकाची प्रलंबित नियुक्ती पत्रे मिळणे, आंदोलका वरील कारवाई बिनशर्त वापस घेणे, सारथी संस्था वाढीव निधी, आरक्षणा साठी मयत व्यक्तींच्या कुटुंबातील एक व्यक्तीस शासकीय सेवेत घेणे व नुकसान भरपाई, आण्णा साहेब पाटील महामंडळ नियम अटी दुरुस्ती अशा व इतर सर्व मागण्या कडे लक्ष वेधण्यासाठी सदरचे मौन सत्याग्रह अखिल भारतीय मराठा समाज संघटन च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. ज्यांना मौन सत्याग्रह करणे शक्य झाले नाही अशा समाज बांधवानी काळे मास्क व काळी फीत लावून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला राज्य स्तरावर हा मौन सत्याग्रह झाला असुन विविध जिल्ह्यातून आप आपल्या स्तरावर अनेकांनी सहभाग नोंदवला. समाजाच्या विविध प्रश्नांवर या द्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संत सज्जन विचारवंत यांचे नेतृत्वा खाली समाज संघटीत करण्याचा उद्देशाने या पुढे सुद्धा मार्गक्रमण होणार असुन अशाच प्रकारे समाजोन्नती उपक्रमात समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा समाज संघटन च्या वतीने संस्थापक दिलीप गायकवाड, जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील-औरंगाबाद, बाबासाहेब गुंजाळ ,पालघर यांनी मौन सत्याग्रह केला असून या सह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला असल्याची माहीती दिलीप गायकवाड, संस्थापक अखिल भारतीय मराठा समाज संघटन यांनी दिली आहे.