हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sim Card Rule : नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठीच्या नियमांत सरकारकडून बदल करण्यात आलेला आहे. यामुळे एकीकडे काही ग्राहकांना सिमकार्ड अगदी आरामात मिळू शकेल तर दुसरीकडे मात्र काहींना त्यासाठी त्रास सहन करावा लागेल. नवीन सिम कार्ड घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन सुविधा देखील दिली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सिम कार्ड आपल्याला घरपोच दिले जाईल.
सरकरने सिम कार्डच्या नियमांत बदल केला आहे. ज्याअंतर्गत आता १८ वर्ष पूर्ण नसलेल्या नागरीकांना आता सिमकार्ड मिळू शकणार नाही. त्याच बरोबर ज्यांची मानसिक स्थिती ठीक नाही त्यांनाही सिम कार्ड घेता येणार नाही. तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जाईल. Sim Card Rule
१८ वर्षांवरील नागरिक आता डिजिलॉकर मध्ये स्टोअर केलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट्सद्वारे स्वतःचे व्हेरिफिकेशन करू शकतील. हे नवीन नियम डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशन (DoT) कडून लागू करण्यात आलेले आहे. या नवीन नियमांसाठी कॅबिनेट कडून १५ सप्टेंबर रोजी मंजुरी देखील मिळाली आहे.
या नवीन नियमांतर्गत युझर्सना आता नवीन सिम कार्ड कनेक्शन घेण्यासाठी UIDAI ची आधार बेस्ड e-KYC सर्व्हिस वापरावी लागेल. याद्वारे व्हेरिफिकेशन करण्यासाठी १ रुपया शुल्क आकारले जाईल. Sim Card Rule
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://dot.gov.in/access-services/subscriber-verification
हे पण वाचा :
खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा
HDFC Bank च्या रिकरिंग डिपॉझिट्सवर आता मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा
2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा
FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे