संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी….; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. यावरून मराठा क्रांती मोर्चाने संजय राऊत यांच्यावर टीका केली. “संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल, असा इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला.

राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने संभाजीराजे यांना सूचक इशारा दिला.

दरम्यान मराठा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार याची भेट घेत राष्ट्रवादीने शिवसेनेशी बोलून संभाजीराजेंना पाठींबा द्यावा, अशी मागणी केली. मातरम शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल माध्यमांशी बोलताना कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येत असलेआचे जाहीर करत संकेत दिले. संजय राऊतांच्या संकेतानंतर मराठा क्रांतीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अंकुश कदम ?

मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी राऊत यांना इशारा दिला आहे. कदम याणी म्हंटले आहे की, “संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्या शिवाय राहणार नाही. २०२४ ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार,छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असे कदम यांनी म्हंटले आहे.