गॅस एजन्सीच्या लाखो रुपयांवर सहा जणांनी मिळून मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सिडको परिसरातील आदित्य गॅस एजन्सी येथील कॅशियर हेमंत गुडीवाल‌ यांना भर रस्त्यात अडवून दिवसभरात एजन्सीचे जमा झालेले तीन लाख 51 हजार 190 रुपये सहा जणांनी 22 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता लुटले होते. या गुन्ह्याची उकल करण्यास सिडको पोलिसांना यश आले आहे. गॅस एजन्सीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनीचे पैसे लुटण्याचा प्लॅन बनवण्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालक आला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी संकेत वेलदोडे (25, रा. एकतानगर), पवन डोंगरदिवे (21, रा. अंबरहिल), सागर पारथे (22, रा. मिसारवाडी), समीर पठाण (21, रा. जाधववाडी) व विकास बनकर (21, आंबेडकरनगर) यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

सिडकोचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीचे कॅशियर गुडीवाल हे दिवसभर जमा झालेले पैसे एका बॅगमध्ये भरून प्रोझोन मॉल जवळ राहणाऱ्या मालकाच्या घरी देण्यासाठी जात होते. त्यांना एजन्सीत काम केलेले संकेत वेलदोडे आणि विकास बनकर यांच्यासह इतरांनी अडवून मारहाण करीत पैसे हिसकावून पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक आवचार यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर माहिती असणाऱ्यांनीच ठरवून दरोडा टाकल्याचे तपासात समोर आले. यानुसार एजन्सीतील आजी-माजी कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. तेव्हा संकेत व विकास यांच्यावर संशय आला. या दोघांसह इतर आरोपींना दारूचे व्यसन आहे. व्यसनासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी एजन्सीचे पैसे लुटण्याचा प्लॅन बनवला.

यानुसार लूटमार करीत तीन लाख 51 हजार रुपये लंपास केले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना शोधून काढले. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार, दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक अशोक अवचार, हवालदार संतोष मुदीराज, विजयानंद गवळी, नाईक इरफान खान, गणेश नागरे, शिवाजी भोसले, आणि स्वप्नील रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

Leave a Comment