शिक्षकी पेशाला काळिमा ! नराधम मुख्याध्यापकाकडून सहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेत चक्क एका शाळेतील मुख्याध्यापकानेच शाळेतील विद्यार्थीनीवर अतिप्रसंग केला आहे. या मुख्याध्यापकाविरोधात पीडित विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर हिंमत करून या शाळेतील इतरही सहा मुली पुढे आल्या. त्यांनीदेखील मुख्याध्याकांवर गंभीर आरोप केले.

काय आहे प्रकरण ?
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गणावे केंद्र शाळा क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला आहे. शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याध्यापकानं आणखी सहा मुलींवर असाच अत्याचार केल्याचा आरोप त्या विद्यार्थिनीनी केला आहे.

रत्नागिरीत जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून समोर आलेल्या या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे शाळेतील शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोपी मुख्याध्यापक शाळेतून फरार झाला आहे. सध्या पोलिसांकडून फरार मुख्याध्यापकाचा सुरू आहे. इयत्ता सहावीतील्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधम मुख्याध्यापकाचं नाव नथू शामू सोनवणे आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुख्याध्यापक सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment