Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक

Small Savings Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Saving Scheme : आता नागरिकांना सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस बचत योजना इत्यादी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. अर्थ मंत्रालयाच्या 31 मार्च 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये लहान बचत योजनांसाठी KYC चा भाग म्हणून हे बदल सूचित करण्यात आले आहेत.

Small savings schemes interest rates unchanged for Jan-Mar quarter of FY  2019-20:Fin Min

हे लक्षात घ्या कि, आतापर्यन्त आधारचे डिटेल्स न देताही या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येत होती. मात्र, आता सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड देणे बंधनकारक झाले आहे. आता नुकत्याच आलेल्या अधिसूचनेमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की,” गुंतवणूकदाराला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्तीच्या गुंतवणुकीवर पॅन कार्ड द्यावे लागेल.” Small Saving Scheme

PAN card, Aadhar now a must for small savings schemes including PPF and NSS

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आता लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना आधार जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचा वेळ उपलब्ध असेल. तसेच ज्या नवीन सदस्यांना आधारशिवाय एखाद्या लहान बचत योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्यांनाही खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आपला आधार नंबर द्यावा लागेल. Small Saving Scheme

PPF : आता पॅन-आधारशिवाय नाही उघडणार पीपीएफ, सुकन्या समृद्धी खाते; जुन्या  खात्यालाही लागू होणार नियम - pan and aadhaar made mandatory for investing  in small savings schemes ...

जर त्याला/तिला UIDAI कडून अजूनही आधार नंबर मिळालेला नसेल तर ते आपला आधार एनरोलमेंट नंबर देखील देऊ शकतात. तसेच जर ठेवीदाराने दोन महिन्यांच्या दिलेल्या कालावधीतही पॅन कार्ड जमा केले नाही, तर त्या व्यक्तीचे खाते गोठवले जाईल. या अधिसूचनेमध्ये असेही म्हटले गेले की, आता लहान बचत खाते उघडताना पॅन कार्ड जमा करावे लागेल. तसेच खाते उघडण्याच्या वेळी पॅन दिले नसल्यास खालील प्रकरणांमध्ये खाते उघडल्यानंतर दोन महिन्यांच्या आत ते सबमिट करावे लागेल :

खात्यातील बॅलन्स पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल.
खात्यातील सर्व क्रेडिट्सची एकूण रक्कम कोणत्याही आर्थिक वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
खात्यातून एका महिन्यात सर्व पैसे काढण्याची आणि ट्रान्सफरची रक्कम दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असेल. Small Saving Scheme

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ