घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है.. संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती,’ असा घणाघात  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केला. ज्यानंतर थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या शाहांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी एक शेर ट्विट करत शाहांवर निशाणा साधला आहे.

”तूफान ज्यादा हो तो,

कश्तियाँ डूब जाती है…

और घमंड ज्यादा हो तो..

हस्तियाँ डूब जाती है ।”

असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

यापूर्वीही 7 फेब्रुवारीच्या ट्विटमध्ये राऊत यांनी शहांचा चांगला समाचार घेत ट्विट केलं होत. यात ते म्हणाले, ‘1975 मध्ये रजनी पटेल आणि 90 मध्ये (बहुतेक मुरली देवरा यांनी) अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली’, असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला.

काय म्हणाले होते अमित शाह ?
‘भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती. महाराष्ट्रात तीन चाकी ऑटोरिक्षाचं सरकार तयार झाल्याचं ते म्हणाले. तीन चाकी सरकारची चाकं तीन दिशेला आहेत’, असं म्हणत शिवसेना आणि महाविकासआघाडीवर शाहंनी निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे शिवसेनेनं प्रचार केला. राज्यातील सरकार हे जनादेशाचा अनादर करुन स्थापन झालेलं सरकार आहे, असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत सोडत हे राजकारण झाल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment