आता पैसे, कार्ड किंवा वॉलेट चोरीला गेले तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही, सर्व वस्तू घर बसल्या परत मिळवून देईल ‘ही’ पॉलिसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण विचार कराल की, एखाद्याचे पैसे आणि पर्स सर्व क्रेडिट / डेबिट कार्ड आणि पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) यासारख्या महत्वाच्या कार्डांनी भरलेले वॉलेट चाेरीला गेले आणि त्याला त्याची काळजीच नाही हे कसे होऊ शकते. परंतु हे खरे आहे. आता आपल्याला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आता बाजारातही अशी पॉलिसी आलेली आहे, ज्यामध्ये तुमचे वॉलेट चाेरीला गेले तरी त्यात ठेवलेली सर्व महत्त्वाची कार्डे तुम्हाला विना शुल्क घरपोच आणून दिली जातात. याशिवाय तुम्हाला झटपट कॅश देण्याचीही व्यवस्था केली जाते. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापल्या नावांवर ही पॉलिसी सुरु केली आहे. आपण गुगलवर वॉलेट थेफ्ट पॉलिसी (Wallet Theft Policy) सर्च करा आणि तुम्हाला अनेक कंपन्यांविषयी माहिती मिळेल.

ही पॉलिसी अशा प्रकारे मदत करते
वन असिस्ट नावाच्या कंपनीने या पॉलिसीला वॉलेट असिस्ट एज (Wallet Assist Edge) असे नाव दिले आहे. या पॉलिसीसाठी कंपनी वार्षिक 1599 रुपये शुल्क घेते. ही पॉलिसी घेतल्यानंतर, जर तुमचे वॉलेट चाेरीला गेले असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या बँकांचे कार्ड ब्लॉक करण्यासाठी कोठेही कॉल करण्याची गरज भासणार नाही. आपल्याला फक्त कंपनीला फोन करावा लागेल, त्यानंतर आपली सर्व बँकिंगशी संबंधित सर्व कार्डे बंद केली जातील. याबरोबरच, जर आपण अशा ठिकाणी असाल जेथे आपल्याकडे कॅश नसेल तर कंपनी अशा वेळी आपल्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंतच्या कॅशची व्यवस्था करेल. इतकेच नव्हे तर कंपनी हॉटेलचे बिल, ट्रेन किंवा विमानाच्या तिकिटांचीही व्यवस्था करेल, शिवाय कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुम्हाला हे या पॉलिसीअंतर्गत करता येईल.

घरबसल्या मिळतील इतर महत्वाची कार्डे
पोलिसांकडून वॉलेट चाेरीच्या तक्रारीची कॉपी घेऊन कंपनीला दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही कार्यालयात फरफट करावी लागणार नाही किंवा ही सर्व आवश्यक कार्डे पुन्हा तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. हे काम आपल्याला कंपनीकडून या पॉलिसीअंतर्गत विनामूल्य केले जाईल. सर्व कार्डे पुन्हा तयार होऊन वेळोवेळी आपल्याला घरपोच मिळतील.

एटीएम किंवा ऑनलाईन फ्रॉडचा समावेशही
अनेक कंपन्या एटीएमच्या फ्रॉडद्वारे पैसे काढून किंवा ऑनलाइन फ्रॉड किंवा डुप्लिकेट कार्ड बनवून या योजनेद्वारे फसवणूकीलाही कव्हर करतात. तसेच, मोबाइल चोरीला जाण्याच्या बाबतीत सर्व्हिस प्रोव्हाडरचा नंबरही शोधण्याची आवश्यकता नाही. कंपनीला माहिती दिल्यानंतर कंपनीच आपला नंबर त्वरित ब्लॉक करण्याची सुविधाही देत ​​आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment