हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेतील रुग्नांची संख्या कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे शस्त्र मानले जात आहे. लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र इस्लामपूर येथील एका 108 वर्षीय आजींनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यानिमित्ताने या लढवैय्या आजींचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साडी चोळी देऊन सत्कार देखील केला आहे.
आमच्या इस्लामपूर शहरातील १०८ वर्षीय जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे. pic.twitter.com/DnUxWgxcS8
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2021
108 वर्षीय जरीना अब्दुल्ला शेख यांनी कोरोनाला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत आणि कोरोना शी जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तसच सांगलीचे पालकमंत्री यांनी देखील आज दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसंच यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला तीन व्हेंटिलेटर मशीन देखील जयंत पाटील यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी प्रत्येकानं लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावं असं आवाहन देखील केला आहे.