औरंगाबाद : वाझे गॅगचे वसूली प्रकरण पूर्णपणे बाहेर आले तर राज्यातील आघाडी सरकारमधील अर्धा डझन लाभार्थी मंत्र्याचे नावे समोर येतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. आता गृहमंत्री अनिल देशमुख जात असून मंत्री अनिल परब हे बहुतेक तयारीला लागले असेल, असतील, असे खळबळजनक विधानही त्यांनी केले. वसुली प्रकरणावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागतानाच सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही केली. सुभेदारी विश्रामगृह येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, माजी महापौर भगवान घडमोडे, समीर राजुरकर, राम बुधवंत आदी उपस्थित होते. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांचा काय विचार आहे, असा सवाल सोमय्या यांनी करत देशमुख यांना शुद्ध असल्याचे सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवालही त्यांनी करत ठाकरे व पवार यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली. सचिन वाझे वसूली टोळीचे कलेक्शन किमान दोन हजार कोटींचे आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
टीआरपी घोटाळ्यात जे चॅनल अस्तित्वात नाही, कागदोपत्री आहेत, अशा चॅनलच्या नावे शेकडो कोटींचे उत्पन्न दाखवून मनी लॉन्ड्रिंग केले. बुकींकडून वसूली, पोलीस बदल्यात घोटाळा आदी घोटाळ्यातून हे कलेक्शन करण्यात आल्याचा सोमय्या यांनी आरोप केला आहे. ईडीकडे कागदपत्रे पाठविल्याचेही त्यांनी नमूद करत ईडी असेल, वसुली प्रकरण पूर्णपणे बाहेर आले तर या आघाडी सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांची नावे समोर येतील, असा दावा त्यांनी केला. अनिल देशमुख जात आहे तर मंत्री अनिल परब बहुतेक तयारीला लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
वाझेच्या नियुक्तीची फाईल गायब केल्याचा आरोप करीत सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याद्वारेच सचिन वाझे याची नियुक्ती झाली, असा आरोप केला. वाझे याच्या नियुक्तीची फाईल मंत्रालयातून गायब झाली आहे, त्यास ठाकरे सरकारच जबाबदार आहे, असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली.
त्यावर भाष्य नाही…
राज्यात महायुतीची सत्ता असतानाच शिवसेनेच्या कोणी मंत्र्याने घोटाळा केला का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता भाजप नेते सोमय्या यांनी यावर थेट भाष्य न करता परिसंवाद घेऊन त्यावर चर्चा करु, असे किरीट सोमय्या म्हणाले.