लखनऊ (उत्तर प्रदेश ) | २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली या मतमोजणीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले. त्याच प्रमाणे ऐतिहासिक आणि विक्रमी विजय देखील भाजपने या निवडणुकीत मिळवला आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेल्या एका मुस्लिम कुटुंबात याच दिवशी एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्यात आले आहे.
Gonda: Family names their newborn son ‘Narendra Modi’. Menaj Begum, mother says, “My son was born on 23 May, I called my husband who is in Dubai&he asked ‘Has Narendra Modi won?’ so I named my son Narendra Modi. I want my son to do good work like Modi ji&be as successful as him.” pic.twitter.com/ywadXyiBLc
— ANI UP (@ANINewsUP) May 25, 2019
उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील एका मुस्लिम कुटुंबात २३ मे रोजी मुलाचा जन्म झाला. वजीरगंज येथील परसापूरमधील मोहम्मद इदरीश आणि मैनाज बेगम यांना मतमोजणीच्या दिवशीच मुलगा झाला आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती मुलाचे नाव काय ठेवायचे याची. मुलाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी ठेवायचे असा हट्ट आईने धरला. यावर कुटुंबातील अन्य सदस्यांनी मैनाज बेगम यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यासाठी दुबईत नोकरी करणाऱ्या पती मोहम्मद इदरीश यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली.
सर्वांनी सांगितल्यानंतर ही बाळाच्या आईने नावासाठी हट्ट धरल्यामुळे अखेर कुटुंबीयांनी मोदी नाव ठेवण्यास मंजूरी दिली. यासंदर्भातील जन्म दाखला ग्राम पंचायतीकडे पाठवला आहे. नरेंद्र मोदी देशाचे चांगले नेते आहेत. उज्ज्वला योजना, जनधन खाते, अशा अनेक योजनांमुळे फायदा झाल्याचे मैनाज बेगम यांनी सांगितले. तिहेरी तलाक संदर्भात कायदा करुन मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिल्याचे त्या म्हणाल्या.