… म्हणून केंद्र सरकारने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे : सचिन पायलट यांचा सरकारवर निशाणा

0
42
sachin pilot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजप पक्षाला केंद्रामध्ये सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला अपयशी सरकार म्हंटले आहे. देशात महागाई ,बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे. काँग्रेसनेते सचिन पायलट यांनी देखील ७ वर्षे पूर्ण केलेल्या भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे. जे या सरकारने करायला पाहिजे होते ते केले नाही असे पायलट यांनी म्हंटले आहे .

याबाबत बोलताना पायलट म्हणले की ,”सात वर्ष पूर्ण केल्यानंतर केंद्र सरकारने जनतेची माफी मागितली पाहिजे. जे करायला हवं होतं ते या सरकारने केलं नाही. एक मजबूत सरकार ते असते जे जनतेच्या दुःखात जनतेला उपयोगी पडते. भाषण देणे ,इव्हेंट मॅनेजमेंट करणे, वाद निर्माण करणे म्हणजे मजबूत सरकार नव्हे” असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

यावेळी पुढे बोलताना पायलट म्हणाले स्वतंत्र भारताच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात जेव्हा सार्वत्रिक लसीकरण केले गेले आहे, हे लसीकरण केंद्र सरकारनेच केला आहे. मात्र पहिल्यांदाच राज्य सरकारांवर लसीकरण ढकलले गेल्याचे आम्ही पाहिले आहे. असे देखील सचिन पायलट यांनी भाजप सरकारवर टीका करताना म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here