औरंगाबाद : करमाड जवळील गोलंटगाव येथील तरुणांच्या हत्येचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून लुटमरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी कार जप्त केल्याने जमिनावर बाहेर आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हुबेहूब दिसणारी दुसरी वाहन बुक केली. व त्याच्या चालकाची निर्घृणहत्या करून चारचाकी वाहन पळविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपिना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चारचाकी वाहन, मोबाईल सह अकराशे रुपये जप्त केले आहे. विशाल राजेंद्र मिश्रा (रा. कादरीनगर, ता.औसा, जि.लातूर), शिवाजी दत्तू बनसोडे (रा. कबीरनगर, ता.औसा,जि.लातूर), सुदर्शन जनकनाथ चव्हाण (रा.उजनी, ता. औसा,जि.लातूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विशाल वासुदेव रामटेके वय-32 (रा.नागपूर) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मिश्रा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो पुणे येथे ओला कंपनित कॅब चालवायचा. मात्र ती कॅब उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी लुटमरीच्या गुन्ह्यात जप्त केली आहे. त्यामुळे त्याने गावाकडील मित्र सुदर्शन आणि शिवाजी यांच्या सोबत मिळून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनासारखी हुबेहूब दिसणारी दुसरी वाहन पळविण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे तिघेही नागपूर येथे गेले. व नागपूरहून जालना येथे जाण्यासाठी त्यांनी एक असेंट गाडी भाड्याने केली. या गाडिवर मृत विशाल रामटेके हे चालक म्हणून होते. नागपूरहून जालना येथे आल्यावर मध्यरात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास अंधारात तिन्ही आरोपीनी लघवीसाठी वाहन थांबविण्याचे चालकाला सांगितले. वाहन घेऊन पसार होण्यासाठी तिघांनी चालक रामटेकेला मारहाण करण्यास सुरुवात केली.
मात्र रामटेकेने तिघांना विरोध करीत प्रतिकार करण्यास सुरुवात केली. प्रतिकार होत असल्याने आरोपीनि रामटेके यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून नायलॉनदोरीने गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता आरोपीनी गाडीतील लोखंडी पट्टीने पोटात भोसकले. रामटेके मृत झाल्याची खात्री पटताच तिन्ही आरोपीनी मृतदेह वाहनात टाकले. व जालन्याच्या पुढे औरंगाबाद रस्त्यावरील गोलटगाव फाटा ते गोलटगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गट क्र-260 च्या झुडुपात फेकून दिले व घटनस्थळावरून तिघेही पसार झाले होते.