काश्मिर नाही हो ! हे तर आहे महाराष्ट्रातील नंदूरबार; थंडीमुळे होतोय बर्फ तय‍ार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाट धुक्यात बुडालेली वाट, सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, बर्फामुळे पसरलेली चादर, कानात निनादणारी पक्ष्यांची सुरेल गाणी, असे वातावरण काश्मीरमध्ये पहायला मिळते. मात्र, हे सर्व वातावरण महाराष्ट्रातील नंदुरबार इथं पहायला मिळत आहे. सातपुड्यात पारा घसरला असून कडाक्याच्या थंडीनं संपूर्ण परिसर गारठला आहे. नंदुरबार मध्येही तापमानाचा पारा घसरल्याने काही ठिकाणी अक्षरश: बर्फाची चादर पसरली असल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. तापमानाचा पारा घसरल्याने महाराष्ट्र गारठला असून हुडहुडी भरली आहे. अशात नंदुरबार या ठिकाणीही सध्या पारा खाली आल्यामुळे बर्फ तयार होत आहे. या ठिकाणी अजून 3 दिवस अशाच प्रकारे कडाक्याची थंडी राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी येथील लोकांकडून जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

वातावरण बदलाचा परिणाम सध्या सर्वत्र जाणवू लागला आहे. कडाक्याच्या थंडीबरोबर काही ठिकाणी बर्फही तयार होत आहे. नंदुरबार या ठिकाणी सध्या वाहने, घरांवर बर्फ साचत असल्यामुळे या ठिकाणी लोकांकडून तो हटवला जात आहे. पारा खालावल्यामुळे लोकांकडून शेकोट्या पेटवल्या जात आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने त्याचा कयीसा परिणाम महाराष्ट्रातील वातावरण बदलावर झाला आहे.

 

आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरड्या स्वरूपाचे राहणार हवामान

बदलत असलेल्या वातावरणामुळे राज्यातील पुढील काही दिवसात हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामध्ये आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरड्या स्वरूपाचे हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा येथील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

12 जानेवारी रोजी मराठवाडा, विदर्भात मेघवृष्टीची शक्यता

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात कोरडे स्वरूपाचे हवामान राहणार आहे. तर मराठवाडा येथे तुरळक आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

13 जानेवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी कोरडे स्वरूपाचे हवामान राहणार आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस पडण्याची हवामान खात्याने वर्तवली आहे.

You might also like