तर…थेट 4 एप्रिल पर्यंत होईल दुकान सील; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

औरंगाबाद | कोरोना वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.या पार्श्वभूमीवरच शहरात आज मध्यरात्रीपासून अंशतः लॉक डाऊन सुरू करण्यात येणार आहे. यात दुकानदाराने सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही तर थेट 4 एप्रिल पर्यंत दुकान सील करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.गेले आठवडाभर दररोज 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. कहर म्हणजे मंगळवारी तब्बल साडेपाचशे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाची ही साखळी तोडण्या करिता नुकतीच मनपा प्रशासक, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी समवेत बैठक झाली. यात गुरुवार 11 मार्च पासून शहरात अंशतः लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान सर्व कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत परंतु नियोजित परीक्षा कोरोना चे नियम पाळून पार पडतील. हॉटेल देखील आसन क्षमतेच्या 50% नियमाप्रमाणे सुरू राहतील. लोकांना व्यवसायही करता येईल परंतु त्याकरिता नियम पाळणे आवश्यक राहील. यादरम्यान शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा बंद राहतील. या कालावधीत दुकानदारांना व काम करणाऱ्या दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जर कुणी दुकान चालक हा नियम न पाळता दुकान सुरु ठेवत असेल तर थेट 4 एप्रिल पर्यंत दुकान प्रशासनाकडून सील केली जाईल. असा कठोर इशारा देखील चव्हाण यांनी दिला.
——————————भाजी मंडई उद्या बंदच राहणार

भाजी मंडई बाबत सभापतींनी माझी भेट घेतली. त्यांच्यासमवेत चर्चा झाली. त्यांनी काही ठोस आश्वासन दिले तर विचार करू,परंतु उद्या गुरुवारी भाजी मंडई बंदच राहणार आहे. असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पर्यटन स्थळाबाबत निर्णय घेऊ..

औरंगाबाद जिल्ह्यात ऐतिहासिक संस्कृतीची साक्ष देणारी अनेक पर्यटन स्थळे आहे हे पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत आहे.मात्र जो अंशतः लॉक डाऊन लागू होणार आहे त्या मधून पर्यटन स्थळांना सूट द्यायची की पर्यटन स्थळे बंद ठेवावीत या वर निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.