पाणीप्रश्नावर मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरू 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून शहरात पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाच मुद्दा मनसेने उचलून धरला असून आज शहरातून पाणी संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. शहरातील 55 वॉर्डांमधून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलतं करणार आहेत. नागरिकांच्या पाणी समस्या पत्रावर लिहून घेतल्या जाणार असून जवळपास 25 हजार पत्र मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार आहेत. त्यानंतर ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.‌

 

शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून आज सकाळी मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर ताशेरे ओढले. यात्रेदरम्यान रहिवाशांकडून उद्धव ठाकरें साठी पत्र लिहून घेतले जात असून, नागरिकांनी लिहिलेली ही पत्र मनसेचे कार्यकर्ते रिकाम्या हंड्यांमध्ये गोळा करत आहेत. शहरातून अशाप्रकारे 25 हजार पत्र गोळा केले जाणार आहेत.

 

या दरम्यान एकूण 2 हजार 300 पत्र जमा झाले असून सायंकाळपर्यंत आणखी एक हजार पत्रे जमा होणार आहेत, तसेच मनसेचे सर्व शाखा अध्यक्ष घरोघरी जाऊन लोकांना पत्र देण्याची विनंती करणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.

Leave a Comment