विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; 1 ठार, 35 जखमी

Accident Bus Pandharpur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकाच्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून देवदर्शन करून भाविक पंढरपूरकडे निघाले होते. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने भाविकांनी भरलेली बस निघाली होती. बसमधील चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 35 जण जखमी झाले आहेत.

भाविकांनी भरलेली बस विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. बस मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा आली असताना बसमधील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे बस पूर्णपणे पलटी झाली. अचानक घडलेल्या या घडणेमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडून गेला.

bus

या अपघातात बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली असून एकाजण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या वतीने बचावकार्य केले जात आहे.