मुंबई प्रतिनिधी | किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊ नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत सोमय्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये बैठक झाली. यावेळी सोमय्या यांना तिकीट देऊ नये अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात अली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. दरम्यान भाजपनेही ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा केली नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाच लक्ष केले होते. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांकडे शिवसैनिकांनी याबाबत तक्रार केल्याने किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील तिढा आता आणखी चिघळत चालला आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे सोमय्या सोडून इतर कुणालाही उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसेच इतर कोणत्याही उमेदवारीसाठी आपण काम करू, अशी भावना व्यक्त शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाचे –
मी मोदींच्या शाळेत शिकले आहे, त्यांचा विद्यार्थी कच्चा कसा असेल ? – कांचन कुल
केंद्रातील सरकार मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार सरकार – शरद पवार