महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील तर्क वितर्क; शासकीय बैठकांमधील अंदाज

मुंबई| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊन झाले त्याला वर्ष उलटून गेले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन कमी करण्यात आले होते. पण आता करोनाच्या वाढत्या केसेस मुळे आणि पेशंटच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत कर्फ्यू घोषित केला असून, रात्री नऊ पासून संपूर्ण बंदी घोषित केली गेली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेता स्थानिक लॉकडाऊन केले आहे. यामुळे येत्या दोन तारखेला सरकार कुठला निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन सुरू करण्यात आला. 25 मार्च ते 14 एप्रिल तसा 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. त्यानंतर तो पुढे वाढतच गेला. लॉकडाऊनच्या एक वर्षानंतरही करोनाचे हे कहर सुरूच आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रभरात दररोज तीस हजार करोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आता जोर धरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचे समजते. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचे समजते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे नियोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे समजते.

जर दोन तारखेला लॉकडाऊन झाला तर तो आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे नसून थोडा वेगळा असणार आहे. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण गोष्टी बंद करण्याचे आदेश दिले गेले होते. तर या लॉकडाऊन मध्ये गर्दीची ठिकाणे बंद केली जाण्याची शक्यता आहे. या गर्दीच्या ठिकाणांमध्ये शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्रकिनारे, गार्डन, नाट्यगृह, जिम इत्यादी गोष्टी बंद केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच पन्नास टक्के लॉकडाऊन आणि पन्नास टक्के कर्फ्यू अशी नवीन लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like