हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी आहे. काही ठिकाणी काटेकोर तर काही ठिकाणी नियम शिथिल केले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही आहे. आपल्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाता येत नाही तर आवडीचे पदार्थही खाता येत नाही आहेत. ब्रिटनमधील दोन गृहस्थांना यावेळी फास्ट फूड खायची ईच्छा झाली. तर त्यासाठी त्यांनी चक्क २५० मैलांचा प्रवास केला.
ऐकावं ते नवलच म्हणतात ते असे काहीसे असते. रायन हॉल आणि पॅस्ले हॅमिल्टन या परिसरात राहणाऱ्या दोन गृहस्थांना फास्ट फूड खावेसे वाटत होते. पण संचारबंदीमुळे आजूबाजूची सर्व दुकाने बंद होती. पण कोणत्याही परिस्थितीत फास्ट फूड खायचेच म्हणून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जायचे ठरवले आणि चक्क २५० मैलांचा प्रवास केला आणि बर्गर खाल्ले. पीटरबर्गला जाऊन रांगेत थांबून त्यांनी बर्गर खाल्ले. यासाठी त्यांनी वाहनाच्या इंधनावर २७ युरो खर्च केले आहेत.
फास्ट फूडचे दुकान सापडल्यावर त्यांनी चिकन मॅकनट मील, लार्ज बिग मॅक मील, दोन केक, दोन डबल चीजबर्गर अशा वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत चाखली. ज्यासाठी त्यांना एकूण २० युरो खर्च आला आणि हे खाण्यासाठी त्यांना १५ मिनिटे वेळ लागला. यासाठी त्यांनी ७ तासांचा प्रवास आणि २७ युरो खर्च केले. संचारबंदीमुळे काही दिवस फास्ट फूड ना खाल्लेले हे दोघे जणू वर्षानुवर्षे फास्टफूड न खाल्ल्यासारखे प्रवास करून परतले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.