कोल्हापूर प्रतिनिधी। वडिलांचा औषधोपचाराचा खर्च पेलत नसल्याने मुलाने आपल्या चुलत्याच्या मदतीने वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल पाच महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. मयत नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३ रा. कुडित्रे, ता. करवीर) हे कोल्हापुरातील सीपीआर इस्पितळातमध्ये उपचार घेत असताना त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलगा गिरीश नामदेव भास्कर (वय ३२) याला अटक केली असून चुलता तुकाराम पांडुरंग भास्कर (वय ५३, दोघे. रा. कुडित्रे ता. करवीर) हा पसार झाला आहे.
करवीरचे पोलिस निरीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव भास्कर हे मजूर होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या जांगेत गाठ उठली होती. दिवसेंदिवस ही गाठ वाढत गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करुन ही गाठ काढण्यात आली. मात्र त्यांना पुन्हा दीड वर्षानंतर त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. या दोन्ही शस्त्रक्रियेवेळी भास्कर कुटुंबीयांचा लाखांहून अधिक खर्च झाला होता. त्यांच्यावर होत असलेला खर्च आणि औषधोपचारामुळे भास्कर कुटुंबीय हतबल झाले होते.
त्यांच्या उपचारासाठी काहींकडून उसने पैसे घेतले होते. त्यामुळे यापुढील खर्च करणे शक्य नव्हते. मात्र मे २०१९ मध्ये त्यांना पुन्हा वेदना होऊ लागल्याने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. वडिलांना होणारा त्रास मुलाला पाहवत नव्हता. वेदना सहन करण्यापेक्षा वडिलांचा मृत्यू झाल्यास ते वेदनामुक्त होतील, असे त्यांचा मुलगा गिरीश याचे म्हणणे आहे. २१ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका यांची नजर चुकवून गिरीशने वडिलांच्या हाताचे सलाईन काढले. नाकात कापसाचे बोळे घालून रुमालने नाक व तोंड, गळा दाबून खून केला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर आजारी असलेल्या नामदेव यांचा आकस्मित मृत्यूची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला होता. शवविच्छेदन अहवाल हातात आल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली. हा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांच्याकडे वर्ग केला आहे.
इतर काही बातम्या-
अंदाधुंद गोळीबाराने भुसावळ हादरले; भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चौघे ठार
सविस्तर वाचा – https://t.co/VsY8gBPGrM@DGPMaharashtra #CrimeNews @Swachh_Bhusaval
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
एन्काउंटर स्पेशालिस्ट अडचणीत? शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सची चौकशी व्हावी; हितेंद्र ठाकूरांची मागणी
https://t.co/mWxa1sI39T— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019
'या' गावात नेत्यांना, अधिकार्यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात रस्ता नाही असा आरोप@NCPspeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMOIndia @NCPpbn https://t.co/9hLfN01Guk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 6, 2019