….म्हणुन वृद्ध वडिलांना खांद्यावर घेऊन मुलानं धावत गाठलं हाॅस्पिटल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असूनही त्याच्या कोरोना संक्रमणाची संख्या सतत वाढतच आहे.सध्याची परिस्थिती पाहता सरकारने लॉक-डाऊन ३ मे पर्यंत वाढविला आहे.परंतु लॉकडाऊनमधला पोलिसांचा कडकपणा मात्र काही लोकांसाठी त्रासदायक बनला आहे.केरळमध्येही अशीच एक बाब समोर आली आहे,जिथे एका मुलाला आपल्या आजारी पित्याला खांद्यावर घेऊन रस्त्यावर धावत जाऊन रुग्णालयात दाखल करावे लागले.

 

वास्तविक ही घटना केरळमधील पन्नालूर शहरातली असल्याचे सांगितले जात आहे, जेथे एक तरुण आपल्या वडिलांना खांद्यावर घेऊन रस्त्यावर पळताना दिसत आहे. हे सांगण्यात आले की या तरूणाचे वडील आजारी आहेत ज्यांना त्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ऑटोला कॉल केला होता.परंतु लॉकडाऊनचे कारण सांगून पोलिसांनी चेक पोस्टवर ऑटो थांबविला.यानंतर हा तरुण वडिलांना खांद्यावर घेऊन रस्त्यावर धावू लागला आणि धावत जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले.

केरळ राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेऊन या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांना नोटीस बजावताना कमिशनने विचारले आहे की पेशंटला घ्यायला आलेल्या ऑटोला कोणत्या परिस्थितीत अडविण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment